Followers

Thursday, 10 August 2017

गीता

🌸 गीता प्रवचने 🌸
अध्याय सोळावा - ३१५
संसार-समुद्रापासून दूर कांठावर उभें राहून समुद्राची गंमत पाहण्यात आंनद आहे.जो समुद्रात गटांगळ्या खात आहे,ज्याच्या नाका-तोंडात पाणी जात आहे,त्याला समुद्राचा काय आनंद ? संत समुद्रतीरावर उभे राहून आनंद लुटतात.संसारापासून अलिप्त राहण्याची ही जी संतांची वृत्ति,ती अंगी मुरल्याशिवाय आनंद नाही.कमलपत्राप्रमाणे अलिप्त रहा.भगवान बुद्धांनी म्हटलंय, *"संत उंच पर्वताच्या शिखरावर उभे असतात व तेथून ते खालीं संसाराकडे पाहतात.मग हा संसार त्यांना क्षुद्र दिसतो."* तुम्हीहि वर चढून पहा,म्हणजे हा अफाट पसारा क्षुद्र दिसेल.संसारात मग लक्षच लागणार नाही.
*सारांश,भगवंतांनी आसुरी संपत्ती दूर करून दैवी संपत्ती जवळ करावी असें या अध्यायात कळकळीने सांगितले आहे.त्याप्रमाणे यत्न करावा.* सोळावा अध्याय समाप्त.
क्रमशः (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण जय मुक्ताई 👣👏🏻🌷
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 👏🏻🚩

No comments:

Post a Comment