Followers

Wednesday, 9 August 2017

Adivasi

आदिवासी गौरव दिन
    त्या निमित्ताने आद्य क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्याविषयी यांच्याबद्दल मिळवलेली माहिती.
              9/8/2017
       आदिवासी जननायक बिरसा मुंडा
भारतीय स्‍वातंत्र्यलढयात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्‍हेंबर, १८७५ रोजी रांची जवळील लिहतू खेडेगावात सुगमा मुंडा आणि करमी हातू या दाम्‍पत्‍याच्‍या पोटी झाला. याच बालकाने लढवय्या न्‍याय हक्‍कासाठी मोठा लढा उभारुन जे महान कार्य केले त्‍याला तोड नाही.

त्‍यामुळेच बिरसा मुंडा यांना आदिवासी जननायक हा कीताब जनतेनेच बहाल केला.  

त्‍यांचे वडील शेतमजूर होते. घरच्‍या गरीबीमुळे त्‍यांना इंग्रजी माध्‍यमाच्‍या चाईबासा इंग्लिश मिशनरी स्‍कूलमध्‍ये शिक्षणाची संधी मिळाली. इंग्रजी शिक्षणामुळे त्‍यांच्‍यावर आधुनिक विचारांचा प्रभाव पडला. परंतु त्‍यांना भारतीय संस्‍कृतीचा मनस्‍वी अभिमान होता व तो त्‍यांनी निरंतर जपला. नैतिक आचरणाची शुद्धता व एकेश्‍वरवादाचा त्‍यांनी पुरस्‍कार केला. ब्रिटिशांनी १८७८-७९ मध्ये प्रथमच वनाबद्दलचा कायदा केला व जंगल सरकारच्या मालकीचे झाले. ब्रिटिशांच्‍या राजवटीमध्‍ये आदिवासींच्‍या वनसंपत्तीवर असलेल्‍या अधिकारावर बाधा येण्‍यास सुरुवात झाली. आदिवासींना यामुळे बेघर व्हावे लागले. आदिवासींनी उदरनिर्वाहासाठी काही फळ, कंदमूळ, लाकुड्फाटे अथवा जनावरांसाठी चारा तोडल्यास त्यांना शिक्षा होऊ लागली आणि आदिवासीयांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला. हे रोखण्‍याकरीता आदिवासींनी न्‍यायालयात याचिका दाखल केली व आदिवासींचे वनाधिकार पुनर्स्‍थापित करण्‍याची मागणी केली. परंतु सरकारने ती फेटाळल्‍यामुळे आदिवासी समाजात प्रचंड रोष निर्माण झाला.

सन १८९४ मध्‍ये बिहार राज्‍यात भीषण दुष्‍काळ पडला होता. या दुष्‍काळामध्‍ये उपासमारी व महामारीने अनेक लोक मृत पावले. त्‍यावेळी त्‍यांनी गरीब आदिवासी समाजाची निःस्‍वार्थी अंतःकरणाने सेवा केली. ब्रिटीश सरकारने आकारलेला अवाजवी शेतसारा माफ करुन दुष्‍काळावर मात करण्‍याकरिता त्‍यांनी जनआंदोलन केले. हे आंदोलन जहागीरदार व जमीनदार यांच्‍या शोषणाविरुद्ध होते. त्‍यामुळे सामाजिक संतुलन बिघडून अशांतता निर्माण होत असल्‍यामुळे ब्रिटिशांनी जहागिरदार व जमीनदारांच्‍या माध्‍यमातून बिरसा मुंडा यांना रोखण्‍याचा प्रयत्‍न केला. १८९५ मध्‍ये बिरसा मुंडा यांना दोन वर्षाचा करावास झाला त्‍यांना हजारीबाग तुरुंगात पाठविले. त्‍यामुळे सरकारविरुद्ध असंतोष वाढत गेला व ब्रि‍टिश सत्ता उखडून टाकण्‍याचा संकल्‍प त्‍यांनी केला. दोन वर्षाचा सश्रम कारावास उपभोगून परत आल्‍यानंतर आदिवासींच्‍या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी राजकीय स्‍वातंत्र्याची आवश्यकता त्‍यांनी ओळखली. त्‍यासाठी संपूर्ण आदिवासी समाजाला संघटित करण्‍यासाठी प्रयत्‍न करुन त्‍यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध स्‍वातंत्र्यलढा पुकारला.

सन १८९७ नंतर बिरसा मुंडा यांच्‍या नेतृत्‍वाखाली आदिवासी समाजाने ब्रिटिश सरकारविरुद्ध अनेक लढाया करुन त्‍यांना जेरीस आणले. त्‍यांनी पारंपारिक शस्‍त्रांद्वारे म्‍हणजे धनुष्‍यबाण, भाले इत्‍यादींच्‍या साहाय्याने डोंगराळ भागातून ब्रिटिशांवर हल्ले चढवले. ब्रिटिश सरकारकडे अत्‍याधुनिक शस्‍त्रास्‍त्रे होती. तरीदेखील १८९८ मध्‍ये तांगा नदीच्‍या काठावर बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशसैन्‍याला नामोहरम केले. नंतर अतिरिक्‍त कुमक आल्‍यामुळे ब्रिटिशांनी आदिवासी नेत्‍यांना रोखण्‍यात यश मिळवले. त्‍याप्रसंगी सुमारे ४०० आदिवासी शहीद झाले. यात बिरसा मुंडा यांचे योगदान मोठे होते. सन १९०० मध्‍ये बिरसा मुंडा डोमबाडी पहाडांमध्‍ये आदिवासी जनतेस मार्गदर्शन करीत असताना, ब्रिटिश सैन्‍याने हल्ला चढविला व त्‍या ठिकाणी भीषण लढाई झाली. त्‍यांना चक्रधरपूर येथे बंदी करुन रांची कारागृहात त्‍यांची रवानगी करण्‍यात आली. २० मे १९०० रोजी बिरसा मुंडाला एकांत कोठडीत एकटे ठेवले होते. बिरसाने जेवण करणे नाकारले. त्याच दिवशी ते न्यायालयात बेशुध्द पडले. न्यायालयातून कारागृहात आणले. औषधोपचार सुरु केला. जेल अधिक्षक एंडरसनच्या औषधोपचाराने बिरसाच्या प्रकृतीत सुधारणा दिसत होती. सात जून पर्यंत बिरसा ठिक होत. मात्र दि. ९ जून १९०० रोजी बिरसाला रक्ताची उलटी झाली ते बेशुध्द पडले. त्यातच त्यांचा मृत्यु झाला. मृत्युचे कारण ‘एशियाटिक कॉलरा’ हे शासनाने दिले परंतु एकही लक्षण एशियाटिक कॉलराशी जुळत नव्हते. नेपोलियनला आर्सेनिक देवून जसे ठार मारण्यात आले तिच लक्षणे बिरसा मुंडाच्या शरीरावर दिसत होती. मुंडाच्या प्रथेनुसार त्यांना दफन करावयास पाहिजे होते परंतु कारागृहातच दफन करून मृत्युचा पुरावा नष्ट केला.

बिरसाच्या आंदोलनामुळेच इ.स.१९०० मध्ये सरकारने छोटा नागपुर क्षेत्रात जमीन सुधारणा विषयक कायदे लागू केले तसेच बिरसा मुंडा यांच्यामुळे मुंडा आदिवासी शिक्षण, खेळ, विज्ञान, राजकारण अशा अनेक विविध क्षेत्रात उंच भरारी धेतली.

बिरसा मुंडाने आपल्या नैसर्गिक हक्कासाठी संघर्ष केला. त्यांचा हा संघर्ष आदिवासींच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकिय बदलाची प्रक्रिया होती. बिरसा मुंडाने बुध्द कधीच वाचला नाही पण बुध्दांची शिकवण त्यांच्या तत्वज्ञानात प्रखरतेने जाणवता होती. त्यांनी महात्मा फुले, कबीर वाचला नाही तरी सामाजिक, वैज्ञानिकतेचे ते प्रसारक होते. बिरसाचे प्रश्न समोर घेऊन ती प्रक्रिया समाज बदलासाठी लोकशाहीच्या धारणेवर जीवनशैली बनविली तो भारतीय क्रांतीची आधारभूमी आहे. समाज बदलाचा बिरसा मुंडा यांचा विद्रोह हा एक आदिवासींच्या पुर्ण स्वातंत्र्याचा विद्रोह होता.

आपल्‍या २५ वर्षाच्‍या अल्‍पजीवन कालाधीमध्‍ये त्‍यांनी आदिवासींमध्‍ये स्‍वदेशी व भारतीय संस्‍कृतीच्‍या प्रतीजी प्रेरणा जागवली ती अतुलनीय आहे. आजसुद्धा झारखंड, बिहार, ओरिसा, पिश्चिम बंगाल, मध्‍यप्रदेश मधील आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपले आदय दैवत मानतो. बिरसा मुंडा यांनी त्रिस्‍तरीय पद्धतीने समाजाच्‍या शोषणाचे मूळ, परकीय राजकीय व्‍यवस्‍थेत असल्‍याची बाब बिरसा मुंडा यांनी ओळखून त्‍याविरुद्ध आदिवासी समाजास संघटित करुन ब्रिटिश सत्तेविरुद्ध वेळोवेळी आंदोलन पुकारले. आदिवासी समाजाचा आर्थिक स्‍तर उंचावण्‍यासाठी त्‍यांनी प्रचलित असलेल्‍या जमीनदारी व जहागिरदारी पद्धतीविरुद्ध लढा पुकारला.

कुठलाही समाज किंवा देश प्रबोधनाशिवाय खऱ्या अर्थाने प्रगत तसेच क्रीयाशील होत नाही. याची जाणीव बिरसा मुंडा यांना त्‍या काळी होतीच. बिरसा मुंडेच्या विद्रोहामध्ये विचारधारेचा प्रभाव दिसून येतो. त्‍यामुळे शिक्षण, स्वच्‍छता आणि अंधश्रद्धा निर्मूलन यावर विशेष भर देऊन त्‍यांनी समाज प्रबोधन केले. याचाच परिणाम म्‍हणून आदिवासी जनजमातीने शिक्षण, स्‍वच्‍छता यांचा मोठ्या प्रमाणावर अंगीकार केला आहे.
[*💎जानिए आदिवासी कौन💎*
  
       

          आदिवासी कौन है
        =============

_आदिवासी कोई जाति या कोई धर्म नहीं है. आदिवासी उन जातियों का समूह है जो भारत में अनादि काल से निवास कर रहे हैं, जैसे - मुंडा, गरासिया, भील , भिलाला, गोंड, हल्बा, कंवर, कोकणी, अंध, ठाकर, पारधी, महादेव कोली, इत्यादि आदिम जाति के समूह को "आदिवासी" कहा जाता है._

आदिवासी क्या है -
----------------------------------------------
_आदिवासी शब्द आदि + वासी दो शब्दो का बना है जिसका अर्थ अनादि काल से भौगोलिक स्थान पे वास करने वाला व्यक्ति, समूदाय, मूलवासी/ आदिवासी ऐसा होता है_

_आज आदिवासीयों के कई नाम है जो लोगो नें केवल अपने राजनैतिक फायदों के लिये दिये है, जैसे की वनवासी, वनबंघु, जंगली, मूलनिवासी, गिरीजन, बर्बर, एबोरिजनल, जनजाति है._

_आदिवासीयों का संविघानिक नाम- "अनुसुचित जनजाति (Schedule Tribe - ST)" है._

_आज हम आदिवासी का प्रतिबिंबित दृश्यचोर, लूटेरा, गंवार, अनपढ़, अधनंगा मनुष्य की तरह लेते है. क्योंकि TV_मिडीया_ चेनलों और फिल्मों मे हमें ऐसे ही *जान बुझकर* दर्शाया जाता है._

_आज कुछ लोग अपने आदिवासी होने की पहचान छुपाते हैं और वो "कुछ" लोग शहर मे पढाई एवं नौकरी कर रहे व्यक्ति हैं - क्योकि उनकी मानसिकता में आदिवासी चोर, लूंटेरा, गंवार, अनपढ़, अधनंगा, अँधश्रद्दा में माननें वाला इंसान होता है_

_सही मे आदिवासी "कुदरती इंसान" है जिसका महत्व युनो (UNO) ने दिया है. क्योंकि आदिवासी "प्रकृति रक्षक" और L.R.R. 1972 की P.No. 419 में आदिवासीयो का उल्लेख *"नेचुरल कम्युनिटी"* के नाम से किया गया है. हमें गर्व होना चाहिये की हम एक आदिवासी हैं._

     *हम भारत के आदिवासी*
*भारत देश के असली मालिक हैं.*

_आदिवासी का उल्लेख रामायण, महाभारत, बाइबल, कुरान में भी है अत: ये दस्तावेजी साबित भी हो गया है की आदिवासी A/C Ante Christ (इसु ख्रिस्त) पहले का *Nonjudicial* "कुदरती समूदाय" है_

_आज भारत में तकरिंबन १४-१५ करोंड आदिवासी हैं, जो अलग-अलग भौगोलिक स्थान में अपनी अलग-अलग रिती रिवाज, परम्परा, सामाजिक व्यवस्था, भाषा बोली, संस्कृति के साथ जी रहे हैं_

           *आदिवासी धर्म पूर्वी हैं*
*आदिवासी ए/सी (Ante Christ) है!*

_आदिवासीयों का इतिहास में अति महत्वपूर्ण भाग रहा है, और आदिवासीयों की गणना एक "कुदरती" "सच्चे" "व्यवहारिक" और "लड़ायक" कोंम में होती है_
–––––––––––––––––––
_हमें गर्व है की हम एक आदिवासी हैं, कुछ लोग शर्माते हैं, खुद को आदिवासी कहनें से, और शर्मानें वालें ज्यादातर लोग वो हैं जो आदिवासी समाज के नाम पर आरक्षण का फायदा लेकर शहरों में सरकारी पदो पें फर्ज बजा रहे हैं और जो आदिवासी युवा पढाई के लियें शहरो में गये हैं, वो खुद को “आदिवासी” कहनें मे शर्माते हैं क्योकि वो दूसरी संस्कृति / रिती -रिवाज को “आदिवासी सभ्यता” सें बड़ा मानते है और आदिवासी को अधनंगा,चोर-लूटेरा, जंगली,अनपढ़, गंवार होने की कल्पना करते है, जब पढ़ाई, नौकरी, चुनाव या कहीं पर भी फार्म भरने के लिए सर्टिफिकेट बनाते हैं, तो उस समय कुछ याद नही आता है उस समय तो केवल अपना फायदा लेने लिए काम निकालना था, अपना काम होने के बाद समाज जाए भाड़ में ऐसा बोलकर निकल जाता है, जरूरत पड़ने पर फिर से समाज के आसपास घूमता / मंडराता है, औऱ सबसे ज्यादा ऐसे लोग ही समाज को बर्बाद किए हैं !_
–––––––––––––––––––
_जबतक हमारें लोग अपनी आदिवासी सस्कृति,व्यवहार और सभ्यता को नहीं जानेंगे तबतक वो खुद को आदिवासी कहनें सें शर्मायेंगे।_
–––––––––––––––––––
_आदिवासी जीवन दर्शन ,आदिवासी संस्कृति, सभ्यता ,सामाजिक व्यवस्था और व्यवहार सभी धर्मो सें बढ़कर है पहले खुद को समझो बाद में अपनें आदिवासी होने पे गर्व करो, जबतक आप आदिवासी क्या है यें समझोगें ही नही तबतक आप अपनें आप पें “गर्व” नही कर सकोगे, क्योंकि आपकी नजर में आदिवासी का अर्थ जैसे फिल्मों में दिखाते हैं वैसा हिप-हिप-हुर्रे, झींगालाला हो हो, झींगालाला हो हो, अधनंगे, चोर-लूटेरे, जंगली, गंवार, अनपढ़ ,बैल को खाने वाला ,इँसान को खाने वाला ही दिखता है,_
–––––––––––––––––––

मैं खुदको आदिवासी होने पे गर्व करता हूँ क्योकि…..

_१ > हम इस देश के मालिक हैं और सदियों से इस देश में निवास करते आ रहे हैं, आदिवासी का अर्थ ही किसी भौगोलिक स्थान पे अनादि काल से निवास करना है और मैं वो आदिवासी हूँ जो मेरे पूर्वज भारत में सदियों से रह रहे हैं ,भारत देश के हम मालिक हैं !_

_२ > UNO नें किसी धर्म या जाति विषेश को छोड के सिर्फ आदिवासीयों के विकास एवं रक्षा कें लियें ९ अगस्त (9 Auguest) “विश्व आदिवासी दिवस (World Aboriginal Day)” जाहिर किया है!_

_३ >आदिवासी समाज में स्त्री (महिला) की इज्जत की जाती है,और उसें पुरुष कें बराबर का हक दिया जाता है!_

_४ > आदिवासी व्यवहार प्रेम का व्यवहार है, यहाँ किसी कें खानें-पीनें, दूध आदि कुदरती संपत्ति के पैसे (Charge) नही है!_

_५ > क्षत्रिय अगर खुद के राज- रज़वाडो पे गर्व करतें हैं तो इसकी वज़ह सिर्फ और सिर्फ आदिवासी है, अगर आदिवासी जंगलों में मुगल एवं दूसरें दूश्मनो के हमलें का जवाब नही देता तो आज क्षत्रियो का नामोनिशान नही होता, और आज भी गुजरात और राजस्थान के राष्ट्रचिन्ह में एक और क्षत्रिय तो दूसरी ओर भील है,_

_६ > आदिवासी ने आजतक किसी की गुलामी नहीं की और वो जितना सहनशील होता है उतना ही खुंखाऱ होता है!_

_७ > आदिवासी रिती-रिवाज एक दूसरें की सहायता के लियें बने हुवें है और कभी किसी आदिवासी कें माता-पिता किसी वृद्दाश्रम में नही दिखेंगे क्योकि आदिवासीयों के लियें माता-पिता सर्जनहार है। मुझे गर्व है की में आदिवासी हूँ!_

_८ > एकलव्य जैसा वीर स्वयंगुरु आदिवासी है_

_९ >हमें गर्व है कि- बिरसा मुंडा, टांट्या भील, गुंडाधुर, जैसे कई ऐसे क्रांतिकारियो पर।_

_हर शिक्षित आदिवासी जागो औऱ हमारे समाज को बचाने एवं बढ़ाने में अपना योगदान दो!जिस समाज ने आपको बढ़ाया हैं ,उसका कर्ज अदा करो।_

_जय आदिवासी -  जय प्रकृती_

No comments:

Post a Comment