Followers

Thursday, 19 October 2017

Deepawali

॥शुभ दिपावली॥
साधू संत येती घरा।
तोची दिवाळी दसरा॥
..........आम्हा नित्य दिवाळी.........
आपल्या जीवनात कायम दीपावलीचा आनंद टिकण्यासाठी, संतांची शिकवण कायम लक्षात ठेवायला हवी.
आपल्या मनातली, अविवेकाची, षड्रिपूंची, निराशेची काजळी, संतांचे विचार ऐकल्याने दूर होते. संतांची शिकवण म्हणजे जणू, जीवनाची वाटचाल दाखवणारा दिवा. आपल्या जीवनात कायम दीपावलीचा आनंद टिकण्यासाठी, संतांची शिकवण कायम लक्षात ठेवायला हवी.
लखलख चंदेरी तेजाचा अनुभव देणारी दिवाळी, पाहता पाहता कोटय़वधी ज्योतींना आपल्या सोबत घेऊन आली, आकाश कंदील, पणत्या, विद्युत रोषणाई, यांनी घरं सजली नटली, जणू नक्षत्रांचा सडा पडावा, तसा आसमंत उजळून निघाला, लुकलुकणाऱ्या चांदण्या, तसे हे लुकलुकणारे दिवे, अशाच तेज:पुंज चांदण्यांनी कवी कुसुमाग्रजांना कोडय़ात टाकलं होतं. आपल्या ‘पाऊलचिन्हे’ या कवितेत, त्यांनी या चांदण्यांना प्रश्न विचारला, देव खरंच असतो का? मी त्याला पाहिलं नाही, पण तुम्ही संपूर्ण विश्वात फिरता, तुम्ही तरी त्याला पाहिलं आहे? त्यावर, चांदण्या कवीला काय उत्तर देतात पाहा,
स्मित करून म्हणाल्या मला चांदण्या काही, तो मुक्त प्रवासी फिरत सदोदित राही, उठतात तमावर, त्याची पाऊलचिन्हे, त्यांनाच पुसशी तू, तो आहे किंवा नाही?
अरे वेडय़ा, त्या ईश्वराच्या पावलांचे आम्ही ठसे आहोत, त्यापेक्षा त्याच्या अस्तित्वाचा दुसरा पुरावा कोणता हवा? दीपावलीच्या दिवसांत, हे लखलखणारे दिवे, म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावाच नाही का? घराघरात आनंद देणारी, आपसातलं प्रेम वाढवणारी, मनामनात आशेचा दीप लावणारी, उदासीनतेचा अंधार घालवणारी, समृद्धी आणणारी दीपावली प्रत्येकाला हवी हवीशी वाटते. आपल्या जीवनात कायम दीपावलीचा आनंद येण्यासाठी, संतांच्या संगतीचा खूप फायदा होतो, हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात,
दसरा दिवाळी तोची आम्हा सण,
सखे संत जन भेटतील
अमुप जोडल्या सुखाच्या राशी,
पार त्या सुखाशी नाही लेखा
पंढरपूरला रोजच दिवाळी असते, यावर भाष्य करताना, संत निवृत्तीदास म्हणतात,
नित्यता दिवाळी, नाही तेथे द्वैत
पंढरपूरला नित्य कीर्तन प्रवचन यांच्या माध्यमातून, ज्ञानाचे दीप लावलेले असतात, विठ्ठलभक्तीच्या एका धाग्याने सर्व जातीधर्माचे लोक बांधलेले असतात, येथे द्वैत नाही. खरोखर, आपण पाहतो, वारकरी ज्या वेळी आषाढी कार्तिकीलाला विठूरायाकडे जातात त्या वेळी किती आनंदात असतात. चंद्रभागेच्या वाळवंटात, कुठलीही सुविधा नसताना, विठोबाच्या नामात दंग होऊन नाचत असतात. नामदेव ज्या वेळी कीर्तन करीत त्या वेळी ते म्हणत,
बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले,
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी
आपल्या मनातली, अविवेकाची, षड्रिपूंची, निराशेची काजळी, संतांचे विचार ऐकल्याने दूर होते. संतांची शिकवण म्हणजे जणू, जीवनाची वाटचाल दाखवणारा दिवा, विठोबाची आळवणी करणारी आरती नामदेवांनी लिहिली, त्यात ते म्हणतात,
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी
विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी
विठोबाच्या राज्यात कायम सत्संग असतो, म्हणून तिथे कायम दिवाळी असते, आपोआप ईश्वराचे नाव मुखात येते, तो खरा दिवाळीचा दिवस, देवावर त्यांनी जिवापाड प्रेम केलं म्हणून ते म्हणतात, विठुराया, तुझ्यावरून मी माझा जीव ओवाळून टाकला
संत सेना महाराजदेखील संतभेटीसाठी वाट पाहताना म्हणतात,
अवघा निरसला शीण, देखता संत चरण
आजी दिवाळी दसरा, सेना म्हणे आले घरा
तुकाराम महाराज म्हणतात,
तुका म्हणे संतांच्या घरची उष्टावळी
मज ते दिवाळी दसरा सण
संतांनी जे विचार दिले ते अनुभवायला मिळणे, ही खरी दिवाळी. जीवनात खरी दिवाळी अनुभवता यावी म्हणून, प्रथम आपल्या मनाला सकारात्मक केले पाहिजे हे संत शिकवतात. ज्ञानेश्वर महाराज आपले मन शांत असावे यासाठी आग्रह धरतात. एका ओवीत ते सांगतात,
माळीये जेउते नेले तेउते निवांतची गेले,
पाणिया ऐसे केले हो आवे गा
हे जग जणू काही एक उद्यान आहे, इथे एक व्यवस्था आहे. ईश्वर या उद्यानाचा माळी आहे. माळी जिथे नेईल, तिथे पाणी विनातक्रार जाते. त्या प्रमाणे आपले जीवन विनातक्रार असावे, मन निवांत म्हणजे अगदी शांत असावे. आपले सर्व जीवन ईश्वराच्या स्वाधीन आहे. आपल्यातील शुद्ध जाणीव हेच ईश्वराचे रूप आहे. याचा साक्षात्कार, सगुणोपासनेतून, निर्गुणाकडे गेल्यावर संतांना झाला. संतांनी, सर्वसामान्य माणसांना यासाठी गुरूचे महत्त्व विषद केले. उपनिषदात गुरूचा अर्थ, अंधकार घालवणारा असा सांगितला आहे. अज्ञानाचा अंधार घालवणारा, ज्ञानाचा दिवा लावणारा तो गुरू.
ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांना गुरू केले होते. आपल्यातील चैतन्य अथवा शुद्ध जाणिवेचा त्यांना साक्षात्कार झाला. त्या वेळी त्यांनी अभंग लिहिला,
आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू,
हरी पाहिला रे, हरी पाहिला रे
तुकारामांनी विठ्ठलाच्या सगुण रूपाचे वर्णन अनेक अभंगांत केले.
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, इत्यादी, साधनेत प्रगती झाल्यावर, आपल्यातील चैतन्याचा त्यांना साक्षात्कार झाला त्या वेळी ते म्हणतात,
देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर
हे समजल्यावर पुढे ते म्हणतात,
आनंदाचे डोही, आनंद तरंग,
आनंदची अंग, आनंदाचे
सूक्ष्मात, सर्व प्राणिमात्रात, सर्व दृश्य जगात एकच परब्रह्म आहे, हे ज्ञान आहे असे ते म्हणतात. याच ज्ञानासाठी चोखामेळ्याची पत्नी सोयराबाई म्हणते,
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग
हे ज्ञान होण्यासाठी नाम जपसाधनेचे फार महत्त्व आहे, असे संत सांगतात. नाम जप साधना करताना, आपले मन शुद्ध असायला हवे. एकनाथ महाराज म्हणतात,
भव भयाचे कारण,
मन कल्पना मुख्य जाण
रामदास स्वामी म्हणतात,
अंतरी अनुतापे तापले,
तेणे अंतर शुद्ध झाले
मनाला पश्चत्ताप झाला की मन शुद्ध होते.
तुकाराम महाराज म्हणतात,
चित्त शुद्धी नाही तेथे बोध करील काई
मन शुद्ध नसेल तर कितीही चांगली शिकवण दिली, तरी त्याचा उपयोग नाही. या मनाला शुद्ध करण्यासाठी रामदासांनी मनाचे श्लोक लिहिले. कारण ईश्वरदर्शनाचा मार्ग मनातून आहे. हरिपाठात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
संताचे संगती मनोमार्ग गती,
आकळावा श्रीपति येणे पंथे
संतांच्या संगतीने ईश्वर दर्शन होते म्हणजे नक्की काय? यावर, मालाडचे सत्पुरुष
के. वी. बेलसरे म्हणाले, अखंड आनंदाची अवस्था म्हणजे ईश्वर दर्शन किंवा आत्मज्ञान किंवा ज्ञानदीप, आपला आनंद बाह्य़ गोष्टींवर अवलंबून असतो. त्यामुळे मनासारखे झाले नाही, तर तो खंडित होतो. आपल्या आतला आनंद आपल्याला शोधायचा असतो. त्यासाठी तुकारामांचा अभंग पाहा,
असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे
संतांचे विचार, दैनंदिन उपासना या माध्यमातून सर्वाच्या जीवनात रोज दीपावली साजरी होवो.
आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावे । पसायदान हें ॥ १ ॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ॥ २ ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छि तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥
वर्षत सकळमंगळी । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥
चला कल्पतरुंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भाजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ ७ ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टाद्दृष्ट विजयें हो । आवें जी ॥ ८ ॥
तेथे म्हणे श्रीविश्वेशरायो । हा होईल दानपसावो । येणे वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ ९ ॥
माझ्यावर प्रेम करणारे,
माझ्या सुख-दुखाःत साथ देणारे,
वेळोवेळी मदत करणारे,
मला समजुन घेणारे,
माझ्यावर विश्वास ठेवणारे,
तुमच्यासारखी जिवा-भावाची माणस एवढी मिळाली कि,
कधी कसलीच चिंता नाही वाटली
"तुम्ही माझ्या आयुष्यात महत्वाचे आहात"
"तुमच्या असण्यानेच माझे आयुष्य परिपूर्ण आहे. "
मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या लक्ष लक्ष हार्दीक शुभेच्छा !!!!!

Dipawali pujan vidhi

🎪🎪🎪🎪🎪🎪
*दिपावली पुजन विधी*
     



दीवाली पर मां लक्ष्मी, सरस्वती एवं गणेशजी विष्णु जी की पूजा की जाती है। इन दिन इन चारों देवी-देवताओं की विशेष पूजा-अर्चना कर उनसे सुख-समृद्धि, बुद्धि तथा घर में शांति, तरक्की का वरदान मांगा जाता है। दीवाली पर देवी-देवताओं की पूजा में कुछ विशेष बातों का ध्यान रखा जाता है जो निम्न प्रकार हैं-

दीवाली पूजा हेतु पूजन सामग्री

दीवाली पूजा के सामान की लगभग सभी चीजें घर में ही मिल जाती हैं। कुछ अतिरिक्त चीजों को बाहर से लाया जा सकता है। ये वस्तुएं हैं- लक्ष्मी, सरस्वती व गणेश जी काविष्णु जी  चित्र या प्रतिमा, रोली, कुमकुम, चावल, पान, सुपारी, लौंग, इलायची, धूप, कपूर, अगरबत्तियां, मिट्टी तथा तांबे के दीपक, रुई, कलावा (मौलि), नारियल, शहद, दही, गंगाजल, गुड़, धनिया, फल, फूल, जौ, गेहूँ, दूर्वा, चंदन, सिंदूर, घृत, पंचामृत, दूध, मेवे, खील, बताशे, गंगाजल, यज्ञोपवीत (जनेऊ), श्वेत वस्त्र, इत्र, चौकी, कलश, कमल गट्टे की माला, शंख, आसन, थाली,एकांशी नारियल यदि उपलभ्ध हो और श्री यंत्र भी चांदी का सिक्का, देवताओं के प्रसाद हेतु मिष्ठान्न (बिना वर्क का)
ये है दीवाली की पूजा विधि

दीवाली की पूजा में सबसे पहले एक चौकी पर सफेद वस्त्र बिछा कर उस पर मां लक्ष्मी, सरस्वती व गणेश जीविष्णु जी का चित्र या प्रतिमा को विराजमान करें। इसके बाद हाथ में पूजा के जलपात्र से थोड़ा-सा जल लेकर उसे प्रतिमा के ऊपर निम्न मंत्र पढ़ते हुए छिड़कें। बाद में इसी तरह से स्वयं को तथा अपने पूजा के आसन को भी इसी तरह जल छिड़ककर पवित्र कर लें।

ऊँ अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थां गतोपि वा। य: स्मरेत् पुण्डरीकाक्षं स: वाह्याभंतर: शुचि:।।

इसके बाद मां पृथ्वी को प्रणाम करके निम्न मंत्र बोलें तथा उनसे क्षमा प्रार्थना करते हुए अपने आसन पर विराजमान हों

पृथ्विति मंत्रस्य मेरुपृष्ठः ग ऋषिः सुतलं छन्दः कूर्मोदेवता आसने विनियोगः॥
ॐ पृथ्वी त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुना धृता। त्वं च धारय मां देवि पवित्रं कुरु चासनम्‌॥ पृथिव्यै नमः आधारशक्तये नमः

इसके बाद "ॐ केशवाय नमः, ॐ नारायणाय नमः, ॐ माधवाय नमः" कहते हुए गंगाजल का आचमन करें

ध्यान व संकल्प विधि

इस पूरी प्रक्रिया के बाद मन को शांत कर आंखें बंद करें तथा मां को मन ही मन प्रणाम करें। इसके बाद हाथ में जल लेकर पूजा का संकल्प करें। संकल्प के लिए हाथ में अक्षत (चावल), पुष्प और जल ले लीजिए। साथ में एक रूपए (या यथासंभव धन) का सिक्का भी ले लें। इन सब को हाथ में लेकर संकल्प करें कि मैं अमुक व्यक्ति अमुक स्थान व समय पर मां लक्ष्मी, सरस्वती तथा गणेशजी व विष्णु जीकी पूजा करने जा रहा हूं, जिससे मुझे शास्त्रोक्त फल प्राप्त हों।

इसके बाद सबसे पहले भगवान गणेशजी तत्पश्चात कलश पूजन करें फिर नवग्रहों का पूजन कीजिए। हाथ में अक्षत और पुष्प ले लीजिए और नवग्रह स्तोत्र बोलिए। पूरी प्रक्रिया मौलि लेकर गणपति, माता लक्ष्मी व सरस्वती को अर्पण कर और स्वयं के हाथ पर भी बंधवा लें। अब सभी देवी-देवताओं के तिलक लगाकर स्वयं को भी तिलक लगवाएं। इसके बाद मां महालक्ष्मी की पूजा आरंभ करें।
लष्मी जी का आवाहन कीजये(आव्हान लिख दिया है )
108 बार मानसिक मंन्त्र जप करे
मां को रिझाने के लिए करें श्रीसूक्त, लक्ष्मीसूक्त व कनकधारा स्रोत का पाठ

सबसे पहले भगवान गणेशजी, लक्ष्मीजी का पूजन करें। उनकी प्रतिमा के आगे 7, 11 अथवा 21 दीपक जलाएं तथा मां को श्रृंगार सामग्री अर्पण करें। मां को भोग लगा कर उनकी आरती करें। श्रीसूक्त, लक्ष्मीसूक्त व कनकधारा स्रोत का पाठ करें।जो ओडियो सेंड की है आपको उनको सुनियेगा फिर पुनः मंन्त्र जप करे इस तरह से आपकी पूजा पूर्ण होती है।

👉 क्षमा-प्रार्थना करें

पूजा पूर्ण होने के बाद मां से जाने-अनजाने हुए सभी भूलों के लिए क्षमा-प्रार्थना करें। उन्हें कहें-

मां न मैं आह्वान करना जानता हूँ, न विसर्जन करना। पूजा-कर्म भी मैं नहीं जानता। हे परमेश्वरि! मुझे क्षमा करो। मन्त्र, क्रिया और भक्ति से रहित जो कुछ पूजा मैंने की है, हे देवि! वह मेरी पूजा सम्पूर्ण हो। यथा-सम्भव प्राप्त उपचार-वस्तुओं से मैंने जो यह पूजन किया है, उससे आप भगवती श्रीलक्ष्मी प्रसन्न हों।
🌷

*गणेश जी की आरती*🌷

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती, पिता महादेवा।।
एक दंत दयावंत चार भुजाधारी।
माथे पर तिलक सोहे, मुसे की सवारी।
जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती, पिता महादेवा।।
पान चढ़े फूल चढ़े और चढ़े मेवा।
लड्डुवन का भोग लगे, संत करे सेवा।।
जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती, पिता महादेवा।।
अंधन को आंख देत, कोढ़ियन को काया।
बांझन को पुत्र देत, निर्धन को माया।।
सुर श्याम शरण आये सफल कीजे सेवा।। जय गणेश देवा
जय गणेश जय गणेश देवा। माता जाकी पार्वती, पिता महादेवा।।

🌷
*लक्ष्मी जी की आरती* 🌷

ॐ जय लक्ष्मी माता मैया जय लक्ष्मी माता
तुमको निसदिन सेवत, हर विष्णु विधाता॥ ॐ जय लक्ष्मी माता....
उमा, रमा, ब्रम्हाणी, तुम जग की माता
सूर्य चद्रंमा ध्यावत, नारद ऋषि गाता॥ ॐ जय लक्ष्मी माता....
दुर्गारूप निरंजन, सुख संपत्ति दाता
जो कोई तुमको ध्याता, ऋद्धि सिद्धी धन पाता॥ ॐ जय लक्ष्मी माता....
तुम ही पाताल निवासनी, तुम ही शुभदाता
कर्मप्रभाव प्रकाशनी, भवनिधि की त्राता॥ ॐ जय लक्ष्मी माता....
जिस घर तुम रहती हो, ताँहि में हैं सद्गुण आता
सब सभंव हो जाता, मन नहीं घबराता॥ ॐ जय लक्ष्मी माता....
तुम बिन यज्ञ ना होता, वस्त्र न कोई पाता
खान पान का वैभव, सब तुमसे आता॥ ॐ जय लक्ष्मी माता....
शुभ गुण मंदिर, सुंदर क्षीरनिधि जाता
रत्न चतुर्दश तुम बिन, कोई नहीं पाता॥ ॐ जय लक्ष्मी माता....
महालक्ष्मी जी की आरती, जो कोई नर गाता
उर आंनद समाता, पाप उतर जाता॥ ॐ जय लक्ष्मी माता....
स्थिर चर जगत बचावै, कर्म प्रेर ल्याता
तेरा भगत मैया जी की शुभ दृष्टि पाता॥ ॐ जय लक्ष्मी माता....
ॐ जय लक्ष्मी माता, मैया जय लक्ष्मी माता,
तुमको निसदिन सेवत, हर विष्णु विधाता॥ ॐ जय लक्ष्मी माता
अब सभी देवी देवता से अपने मङ्गल की कामना करें जो इच्छा है वो बोले ।
गणेश लष्मी जी को अपने ही घर मे स्थाई निवास करने का निवेदन करे कि आप हमारे घर मे ही रहे ।
*एक बार पुनः रात्रि के ठीक 12 बजे माँ लष्मी जी की पूजा करे।
हो सके तो रात्रि को जागरण करे।
*विशेष*
*हर अमावस्या को ठीक सुबह 10 बजे पीपल पर लष्मी जी का आगमन होता है इसलिए सुबह 10 बजे पीपल के पेड़ में एक घी का दीपक ओर एक तिल्ली के तैल का दीपक अर्पित करे।
घी का दीपक चावल की ढेरी पर ओर तैल का दीपक तिल के ढेर पर रखे पीपल पर माला, पुष्प, गंध, दीप-धूप खीर हलवा अर्पित करे पीपल को तिलक व अपने तिलक लगा कर।
वही बैठकर लष्मी मंन्त्र का जप श्रदा नुसार करे।
 वही बैठकर कनकधारा व सूक्तम का पाठ करे
अंत मे लष्मी जी अपने साथ घर चलने का निवेदन करे
ओर चावल की व तिल की ढेरी से थोड़ेचावल व तिल घर ले आये
जो भी आप किसी के द्वारा बताए नुसार पूजा करे उसके लिए दख्शिना 11 रुपये मन्दिर के दान पात्र में डाल दे।
जिससे कि पूजा का पूर्ण फल आपको ही मिले।


🙏🏼🕉🚩🌸🌺🌻🌼🌹🌷

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻